नारळी पौर्णिमा



सण आयलाय गो नारली पुनवेचा 










श्रावण पूर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा 
नाग पंचमी नंतरचा हा मोठा सण 
याला राखी पूर्णिमा किंवा 
पोटली पूर्णिमा म्हणून पण संबोधले जाते. 
हा दिवस संस्कृत दिवस म्हणून पण साजरा केला जातो. 

सन आयलंय गो आयलाय गो नारली पुनवेचा 
मनी आंनद मावेना कोल्याच्या दुनियेचा 

हा सण कोळी बांधव मोठया प्रमाणात साजरा करतात. 
हा सण शारीरिक आणि प्राकृतिक समतोल साधतो. 
हा काळ माश्याच्या प्रजननासाठी योग्य असल्याने 
या दिवसात मासेमारी बंद असते. 
समुद्रातही उंच लाटा उफाळून येत असतात.

या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी 
त्याचे पूजन केले जाते.
वरुणदेवाचे वास्तव्य समुद्रात असल्याने 
या दोघांची पूजा केली जाते. 
यानंतरच मासेमारी व समुद्राशी निगडित कामे सुरू केली जातात.
भारताला खूप मोठी किनारपट्टी लाभली आहे. 
आपले कोळी बांधव आपल्या आपल्या वाड्या सजवतात, 
होड्या-बोटींना रंगवतात त्यांची डागडुजी करतात. 

संध्याकाळी सगळे सजून धजून दर्या वर जातात 
आणि त्याची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने नारळ अर्पण करून ; 
दर्या-सागराला प्रार्थना केली जाते. 

"तुझ्या रुद्ररुपा पासून आमचे रक्षण कर, 
दर्याचे मासे आमच्या होडीला लागू दे"

काही जण आपापल्या इच्छे प्रमाणे 
सोन्याचा वा रुप्याचा नारळ अर्पण करतात. 
नारळ अर्पण करण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे 
नारळातील पाणी समुद्राच्या यमलहरींना आकर्षित करतात 
व  त्यांचे रूद्ररूप शांत करण्यास मदत होते.



या दिवशी नारळाच्या करंज्या, नारळीभात किंवा 
नारळाच्या वड्या प्रसाद म्हणून केला जातो. 
ठिकठिकाणी जत्रा सुद्धा भरतात. 
एकूणच आनंदी आनंद या सणांच्या 
निमित्ताने साजरा केला जातो. 

तुम्हांला सर्वाना 
नारळी पौर्णिमेच्या 
हार्दिक शुभेच्छा

5 comments:

  1. तरुण पिढीसाठी उपयुक्त माहिती. अभिनंदन.

    ReplyDelete
  2. खूप छान वाटतं तू अस सणांबद्दल लिहितेस ते वाचून

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...